मुलुंड : मानवतेला काळिमा फासणा-या आणि उभ्या पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारे हत्याकांड म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांड आहे. या निर्घृण हत्याकांडाचा आम्ही उपनगरातील सर्व पत्रकार-वार्ताहर निषेध करीत आहोत. याकरीता आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर मा. तहसिलदार, कुर्ला यांच्याद्वारे सदरहू निवेदनाद्वारे खालील मुद्दे उपस्थित करीत असून राज्याचे मुख्यमंत्री आणि कुटुंबप्रमुख या नात्याने त्याचा प्रत्यक्षात विचार करावा आणि जलदगतीने कारवाई करावी.अशी विनंती करणार मुख्यमंत्र्यांना करणार आहोत .
१) जवखेडातील दलित कुटुंब जाधव यांच्या तिहेरी हत्याकांड प्रकऱणी आरोपींना तातडीने अटक करावी.
२) आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा.
३) १५ दिवसानंतरही तपासात प्रगती होत नसल्याने ह्या हत्त्याकांडाचा तपास सीबीआय कडे सुपूर्द करावा.
४) राज्यात आजही उच्च-निच्च विकृत विचारांवर आधारित जनसामान्यावर अन्याय अत्याचार होत असून विविध कायदे असूनही धाक उरलेला नाही. जातपात,उच्चनिच्च या भेदभावावर आधारित सामान्य नागरिकांचे दमन करण्याचे प्रकार चालू आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणी विशेष प्रयत्न करावेत.
५) समाजात सौदार्हपूर्ण वातावरण निर्माण व्हावे याकरिता सामाजिक समरसता जोपासली जावी यासाठी विशेष उपक्रम राबवले जावेत .
पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होईल आणि आणि समाजातील सर्व घटकांना न्याय आणि सुरक्षेची हमी मिळेल अशा त-हेची पावले नव्या दमाने लवकर उचलावीत अशी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे विनंती करीत आहोत. जाधव कुटुंबियांना आपण लवकरात लवकर न्याय द्वावा अशी मागणी आम्ही सर्व पत्रकार, वार्ताहर आणि सामाजिक कार्यकर्ते करणार आहोत .
धन्यवाद.
प्रफुल्ल कांबळे नितीन मणियार विनायक सुतार आनंद पारगावकर
युवा प्रभाव पीएनआर न्यूज लोकमार्ग स्वतंत्र माहितीचा अधिकार
(976800249) (9768006860) (9869856555) (9769103056)
सुप्रिया मोरे एस एम कबीर दीपाली साळवी
पत्रकार प्रेस फोटोग्राफर पत्रकार
(9773563273) (9867866021) (9892368696)
No comments:
Post a Comment